Thursday, November 28, 2024

/

मोर्चात हजारोने सहभागी होण्याचा ‘यांनी’ केला निर्धार

 belgaum

कर्नाटक सरकारचा मराठी भाषिकांवरील अन्याय आणि कन्नड सक्तीच्या विरोधात येत्या 25 ऑक्टोबर रोजीच्या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार गोवावेस रामलिंग वाडी आणि कोरे गल्ली पंच मंडळी यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जागृती बैठकीत घेण्यात आला.

सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी हे होते त्याचप्रमाणे व्यासपीठावर खजिनदार प्रकाश मरगाळे, ज्येष्ठ पंच शिवाजी हावळानाचे, माजी महापौर महेश नाईक, सागर पाटील, राजकुमार बोकडे, सुनील बोकडे, रणजीत हावळानाचे, मदन बामणे व अहमद रेशमी उपस्थित होते.

बैठकीत मराठी भाषिकांवर अन्याय आणि कन्नड सक्तीच्या विरोधात येत्या 25 मार्च रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन तो यशस्वी करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. यावेळी सागर पाटील, रंजीत हावळणाचे, मदन बामणे प्रकाश मरगाळे अध्यक्षस्थानी दीपक दळवी साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सागर पाटील यांनी बैठकीत जमलेल्या युवकाने मोर्चासाठी हजारोंची संख्येने मराठी भाषिकांना गोळा करणे गरजेचे आहे. वास्तविक हा मोर्चा मराठी अस्मिता आणि भगव्या झेंड्याची शान राखण्यासाठी आहे हे सर्वांच्या घराघरापर्यंत कळविणे गरजेचे आहे, असे सांगितले. रणजीत हावळानाचे यांनी खानापूर समितीचे दिगंबर पाटील यांचा तोडगा काय होता अशी विचारणा केल्यानंतर दीपक दळवी यांनी विस्तृतपणे उपस्थितांना त्या तोडग्या याबाबत विस्तृत माहिती दिली.

प्रकाश मरगाळे यांनी सीमा प्रश्नासंदर्भात कोर्टाची आणि महाराष्ट्राची हालचाल कशी सुरू आहे याबाबत माहिती दिली. बैठकीची सांगता होण्यापूर्वी मदन बामणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुधीर नेसरीकर यांच्या आभार प्रदर्शनाने बैठकीची सांगता झाली अभिजीत मजुकर, प्रकाश होनगेकर, विराज मुरकुंबी आदींसह बहुसंख्य युवा वर्ग बैठकीस उपस्थित होता.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.