प्रशासनाशी कोणतीही परवानगी ची मागणी न करता आम्ही 25 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भाषिक अल्पसंख्याक हक्क मिळवण्यासाठी भव्य मोर्चा काढणार असा इशारा देत 1 नोव्हेंबरची काळ्या दिनाची निषेध फेरी काढून केंद्र सरकारचा निषेध करणार असा निर्धार शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत झाला.
रविवारी सायंकाळी शहरातील रंगुबाई पॅलेस मध्ये प्रचंड गर्दीत झालेल्या बैठकीत समितीच्या आक्रमक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निर्णय घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी दीपक दळवी होते.
बैठकीत सुरुवातीला स्वागत प्रास्ताविक करत रणजित पाटील यांनी दिवंगताना श्रद्धांजली वाहिली येणाऱ्या एक नोव्हेंबर ला काळ्यादिनी आपला निषेध नोंदविण्यासाठी आपण सायकल स्कुटरफेरी काढायची आहेआपण विविध प्रसारमाध्यमांतुन ऐकलं किंवा वाचलं असणार की फेरीला परवानगी नाही वैगेरे पण आजपर्यंत आम्ही परवानगी मागतच नाही फक्त त्यांना कळवतो त्याप्रमाणे आम्ही निषेध नोंदविण्यासाठी एकत्र येऊया असे नमूद केलं.
कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करताना महादेव पाटील यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून एक नोव्हेंबरची झलक पंचवीस तारखेला दाखवुया युवकांना सामावून घेऊन समिती बळकट करूया असे सांगत मनपा निकडणुकीतील पराभूत उमेदवारानी सक्रिय व्हावे असे आवाहन केलं.मदन बामणे यांनीजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत असताना फक्त अन्याय आणि अत्याचाराबरोबरच भगव्या झेंड्याचा विषय अग्रणी असावा.मोर्चाची तारीख पुढे ढकलू नका एक नोव्हेंबर काळा दिनी हजारोंच्या संख्येने सामील होऊन निषेध नोंदवूया.येणाऱ्या काळात कार्यकर्त्यांची नावे घेऊन नविन पदाधिकाऱ्यांची निवड करूयाअशी मागणी केली.
नितिन खन्नूकर यांनी समितीच्या कार्यासाठी जर का पैशांची गरज असेल तर आम्ही कार्यकर्ते जमा करू पण एक वेगळ्या माध्यमातून आमच्या समितीची वाटचाल झाली पाहिजे.लवकरात लवकर समितीची पुनर्रचना करा अशी मागणी केली. अनेक कार्यकर्त्यांनी समितीकडे अर्ज दिले आहेत शहर समितीत कार्य करण्यास अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत युवक कार्यकर्त्यांना सामावून घेऊन शहर समितीचा विस्तार करणार असे आश्वासन माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी दिले.समितीत फूट पडणाऱ्या मंडळींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अचानक प्रकट होऊन कार्यकर्त्यांत संभ्रम करणाऱ्याना आडवाअशी मागणी युवा कार्यकर्ते सागर पाटील यांनी केली.