दसरा निमित्त कंग्राळी खुर्द (ता. जि. बेळगाव) येथील मार्कंडेय युवक संघाच्या 55 व्या वर्धापन दिनानिमित्त गावातील देवदेवतांचा पूजन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
मार्कंडेय युवक संघाच्या 55 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजीत पूजन कार्यक्रमाप्रसंगी कंग्राळी खुर्द गावातील मरगाई देवीचे पूजन रमेश धामणेकर यांनी तर, मातंगी देवीचे पूजन अडत व्यापारी दीपक जी. पाटील यांनी केले. तसेच मार्कंडेय व्यायाम शाळाच्या फलकाचे पूजन ग्रा. पं. सदस्य राकेश पाटील, पैलवान प्रशांत पाटील आणि शिवप्रतिष्ठानचे मनोहर पाटील यांच्या हस्ते झाले. व्यायाम शाळेतील श्री मारुतीच्या फोटोचे पूजन आर. आर. पाटीलसर यांच्याहस्ते झाल्यानंतर मार्कंडेय युवक संघाचे अध्यक्ष बी. एन. पुजारी त्यांनी श्रीफळ वाढविले.
कार्यक्रमास मार्कंडेय युवक संघाचे सेक्रेटरी अनंत निलकर, मार्कंडेय व्यायामशाळेचे अध्यक्ष प्रकाश जी. पाटील, बाबू पावशे, किसन पाटील, प्रशांत निलजकर, गजानन पाटील, प्रकाश पाटील, दीपक रा. पाटील, बाळ बसरीकट्टी, सुहास पाटील, सागर पाटील, अशोक निलजकर, ग्रा. पं. सदस्य राकेश पाटील, प्रशांत पाटील, यशोधन तुळसकर, निशांत पाटील, गौतम पाटील, कल्लाप्पा पाटील, आर्मी ज्योतिबा पाटील, बबलू जाधव, एक्स आर्मी अमर निलजकर, राकेश गुरव, शिवप्रतिष्ठानचे विनायक पाटील, अविनाश बाळेकुंद्री, आदींसह गावातील युवावर्ग व मान्यवर उपस्थित होते.