आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत बेळगावच्या सांबरा विमानतळावर दररोज विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत आज मराठी भजन ऐकण्याचा लाभ विमानप्रवाशीना मिळाला.
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावरील मराठी भजन ऐकण्याचा लाभ विमान प्रवाशांना देण्यात आला. केंद्रीय विमान उड्डाण प्राधिकरण आणि बेळगाव विमानतळ प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात विमानतळावरील प्रवाशांनी मराठी भजनाचा लाभ घेतला.
देशभक्तीपर भजन कार्यक्रमात संस्कार भारती या बेळगावच्या संस्थेनेमोठी साथ दिली आहे .
झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या ऐतिहासिक प्रसंगावर आधारित भजन विमानतळावर सादर करण्यात आले. डॉ नीता देशपांडे वैभव गाडगिळ आणि अश्विनी सरनोबत यांनी प्रामुख्याने या भजन कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका निभावली आहे.
भजनाचा कार्यक्रम आणि व्हिडिओ बेळगाव विमानतळाने ट्विटरवर व्हायरल केला असून त्याची चर्चा होत आहे आपल्या पाठीवर पोटचे बाळ बांधून ब्रिटीशांशी लढा देणार्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई चा इतिहास
भजनाच्या माध्यमातून मांडण्याचा बेळगावच्या महिलांचा प्रयत्न बेळगाव विमानतळाच्या माध्यमातून आणि आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण देशभर पोहोचला असल्यामुळे त्याची सर्वत्र जोरदार चर्चा आहे .