Saturday, November 16, 2024

/

मांजात अडकलेल्या घारीला जीवदान

 belgaum

दसरा हा सण आला की मुलांना पतंग उडविण्याचा मोह आवरत नसला तरी पतंगाच्या मांजामुळे मूक पशुपक्ष्यांचा जीव संकटात येत असतो. या पद्धतीने मांजात अडकल्याने संकटात सापडलेल्या एका ब्राह्मणी घारीला सामाजिक कार्यकर्त्यांनी जीवदान दिल्याची घटना आज सकाळी काकती (ता. जि. बेळगाव) येथे घडली

दसरा हा सण आला की मुलांना पतंग आभाळात उडविण्याचा मोह आवरत नाही. मात्र पतंगासाठी वापरण्यात येणारा मांजा धागा आजच्या वर्तमान युगात घातक ठरत असलेचे सर्रास दिसत आहे. या मांजा धाग्यामुळे जीवही गमवण्याची वेळ येऊ शकते. माझ्यात गुरफटून निष्पाप, मूक निष्पाप मूक पक्षांचे बळी गेल्याचे प्रकार सर्रास घडत असतात. प्रसाद दुर्दैवी प्रकार आज काकती येथे घडणार होता, मात्र सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रसंगावधानामुळे तो टाळला.

आज काकती येथे झाडावर मांजाच्या धाग्यात गुंरफटून एक पक्षी तडफडत होता. याबाबत श्रीनिवास कोचेरी यांनी हा माझा धर्म पशूबचाव संघटनेच्या विनायक केसरकर यांना माहिती दिली.

विनायक केसरकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन झाडावर मांजाच्या धाग्यात गुरफटलेल्या त्या पक्षाची सहीसलामत सुटका केली. हा पक्षी म्हणजे एटदार ब्राह्मण घार होती. मांजामुळे मांजामुळे सदर घारीला झालेल्या जखमांवर विनायक केसरकर यांनी उपचार केले.

त्यानंतर वनाधिकाऱ्यांच्या साक्षीने त्या ब्राह्मण घारीला पुनश्च नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. सदर घारीला जीवदान देण्याच्या कार्यात केसरकर यांना सुरज गवी , अनिल गवी आणि श्रीधर बाळेकुंद्री यांनी मदत केली. तसेच या सर्वांनी पंतंग उडवा पण स्वतःच्या तसेच त्या निष्पाप पक्षांच्या जीवाशी न खेळता उडवा. घातक मांजाचा वापर न करता सुती धाग्याच्या वापर करा, असे आवाहन केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.