आधुनिक महिलांना एकट्याने राहणे आवडते .त्यांना मुले जन्माला घालणे आवडत नाही. अशा प्रकारची प्रतिक्रिया दिलेल्या कर्नाटकाच्या आरोग्यमंत्री सुधाकर यांना खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर यांनी ट्विटरद्वारे प्रश्न विचारलाय .
आधुनिक महिलांना काय आवडते ते सोडा पंतप्रधान मोदी बद्दल तुम्हाला काय बोलायचे आहे. जे लग्न करूनही एकट्याने राहत आहेत. असा प्रश्न त्यांनी केला आहे. महिलांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न करणाऱ्या अशा पुरुषांना जागतिक मानसोपचार दिनाच्या निमित्ताने समुपदेशन करण्याची गरज निर्माण झाली आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी ट्विटरवर दिली आहे .
अंजली निंबाळकर या डॉक्टर प्लस आमदार आपल्या हटके स्वभावाने प्रसिद्ध आहेत .कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या प्रतिक्रिया आल्या की त्यांचा समाचार त्या लगेच घेतात.
यावेळी आरोग्यमंत्री सुधाकर यांना त्यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून चांगलेच धारेवर धरले आहे.
पंतप्रधान मोदी यांचा विवाह झाला आहे .तरी ते सिंगल राहतात याबद्दल तुम्हाला काय बोलायचे आहे? असा प्रश्न त्यांनी केला आहे. सुधाकर यांनी एका कार्यक्रमात आधुनिक महिलांबद्दल भाषण करताना आजच्या महिला एकट्याने राहणे पसंत करतात.
त्यांना मुले जन्माला घातलेले आवडत नाही. अशा प्रकारची प्रतिक्रिया देऊन वादाला जन्म घातला. त्यामुळे कर्नाटकातील खानापूरच्या आमदार असलेल्या अंजली निंबाळकर यांनी एकट्याने त्यांचा समाचार घेतला. त्याची राज्य आणि देशभरात चर्चा होत आहे.
Seriously!!!
These men need counselling on World Mental Health Day.Let her live with her choices no one can decide for her but herself…
Any comments on their leader @narendramodi Paradigm shift of living single even after getting married. https://t.co/HGg2auY2l3
— Dr. Anjali Nimbalkar (@DrAnjaliTai) October 11, 2021