दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या एकूण 4,103 रिक्त जागा भरणे आहे. त्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची मुदत ही 03 नोव्हेंबर 2021 आहे.
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी परीक्षा किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त 4 ऑक्टोबर 2021 रोजी उमेदवारांचे वय 15 वर्षांपेक्षा कमी आणि 24 वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत शिथिलतेची तरतूद आहे.
या पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना scr.indianrailways.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर उमेदवार अर्ज करू शकतात. यामध्ये फिटर पदासाठी सर्वाधिक 1460 जागा रिक्त असून इलेक्ट्रिशियन पदाच्या 1019 जागा रिक्त आहे. कॅटेगरीनुसार रिक्त पदांचा तपशील, शैक्षणिक आर्हता, वयोमर्यादा, पगार यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.
पदाचे नाव : अप्रेंटिस
पद संख्या : 4,103 जागा
शैक्षणिक पात्रता : दहावी तसेच आयटीआय मध्ये 50 टक्के पेक्षा अधिक गुण
वयोमर्यादा : 15 ते 24 वर्षे
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 नोव्हेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट : scr.indianrailways.gov.in
जाहिरात पहा : https://cutt.ly/zRZ2Y9c
दहावी आणि आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून उमेदवारांची निवड केली जाईल. निवड प्रक्रियेबद्दल तपशीलवार माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तपशीलवार सूचना तपासू शकता.