Monday, November 18, 2024

/

आं. रा. हिरो स्प्रिंट शर्यतीत ‘याने’ मिळवले सुयश

 belgaum

बेळगावचा एजाझ इनामदार हा भारतातील एकमेव सायकल विक्रेता आहे की ज्याने हिमाचल प्रदेश येथे नुकतीच आयोजित केलेली प्रतिष्ठेची ‘आंतरराष्ट्रीय 9 वी हिरो स्प्रिंट एमटीबी सिमला -2021’ ही खडतर शर्यत यशस्वीरित्या सायकलिंग करून पूर्ण केली आहे. त्याला बेळगावचे त्याचे दोन मित्र बिपिन उंदरे आणि बाळाप्पा कुडची या दोघांची साथ लाभली असून हे तिघेही बेळगाव पेडलर्स क्लबचे सदस्य आहेत.

सदर आंतरराष्ट्रीय शर्यतीत भाग घेणारा इनामदार हा आतापर्यंतचा पहिलाच सायकल विक्रेता असून शर्यतीबद्दल बोलताना तो म्हणाला की, ही सायकल शर्यत उंच-सखल रस्ते, खडकाळ जमीन अशा खडतर मार्गाने आखण्यात आली असल्यामुळे आमच्यासाठी ते मोठे आव्हान होते. तथापि मी आणि माझ्या मित्रांनी जिद्दीने शर्यत पूर्ण केली.

शिवलिक पर्वत ज्याला छोटा हिमालय म्हणतात या ठिकाणचा शर्यतीचा मार्ग विशेष खडतर होता. तथापि तेथील अभयारण्य, पाण्याचे प्रवाह, ओढे -नाले आणि हिमालयाचा ग्रामीण भाग अशा ठिकाणाहून प्रवास करताना हिमालयाकडून आपल्याला मिळणारी शुद्धता, पावनतेचा अनुभव आला, असे इनामदार याने सांगितले.

पोटात गोळे आणणाऱ्या उंच-सखल मार्गासह ग्रामीण रस्ते, गवताची सुंदर कुरणे, घनदाट झाडेझुडपे आणि खऱ्या पर्वताचा आस्वाद घेत मला दोन दिवसात जवळपास 120 कि. मी. अंतर पार करावे लागले. शर्यतीच्या रूपरेषे नुसार पहिले 15 कि. मी. बिगर स्पर्धात्मक शर्यत होती. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात अनुक्रमे 58 कि. मी. अंतर पूर्ण करून 1500 मीटर्सची आणि 48 कि. मी. अंतर पूर्ण करून 1650 मीटरेसची बढती मिळवायची होती.Aizaz inamdar

पहिल्या टप्प्यामध्ये विलीस् पार्क, शिलगाव, आनंदपुर, साधुपुल, जानेदघाट, चाईल, ढोची आणि साधुपुल असे अंतर पार करायचे होते. त्याचप्रमाणे दुसऱ्या टप्प्यात अश्विवीनी खाद, जुंगा, कोटी, मुंडघाट चिनी बंगला, संजोली आणि पीटर ऑफ येथे शर्यत समाप्त असा शर्यतीचा मार्ग होता. या शर्यतीमुळे आम्हा सायकलपटुंना भारतातील अत्यंत आव्हानात्मक परंतु निसर्गरम्य मार्गाचा अनुभव घेता आला.

ज्यामध्ये आशियातील घनदाट जंगल असलेले कुफरी पाणलोट क्षेत्र, चाईल अभयारण्य, चाईल क्रिकेट स्टेडियम, सुप्रसिद्ध जानेद घाट आदींचा समावेश होता, अशी माहिती इनामदार याने दिली. सदर शर्यतीत भाग येणारे बेळगाव पेडलर्स क्लबचे एजाझ इनामदार, बिपिन उंदरे आणि बाळाप्पा कुडची या तिघांनीही शर्यतीचे तीनही टप्पे पार केल्यामुळे त्यांना ‘फिनिशर मेडल’ हे पदक देऊन गौरविण्यात आले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.