बियरच्या बाटलीने डोक्यात वार करून प्राणघातक हल्ला केलेल्या युवकाचा इस्पितळात उपचार सुरू असताना मृत्यू झालाय. बुधवारी मध्यरात्री त्याच्यावर अज्ञाताकडून हल्ला करण्यात आला होता त्यात तो जखमीं झाला होता
रामचंद्र कणबरकर वय 29 रा. उचगाव गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव असून शुक्रवारी सायंकाळी इस्पितळात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
या घटने बाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार रामचंद्र हा बुधवरी रात्री कल्लेहोळ क्रॉस येथे जेवणासाठी गेला होता जेवण आटोपून परतते वेळी तो कल्लेहोळ क्रॉस येथे थांबला असता पाठीमागून अज्ञाता कडून त्याच्या डोक्यात बियरच्या बाटलीने वार करण्यात आला. या घटनेत तो गंभीर जखमी बेशुद्ध अवस्थेत तिथंच पडला होता.
गुरुवारी सकाळी मॉर्निंग वाकर्सनी त्यांला बेशुद्धावस्थेत पाहून उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले.काकती पोलीस स्थानकात हे प्रकरण दाखल झाले होते मात्र अद्याप पोलिसांनी कुणालाही अटक केली नव्हती.
घटनास्थळी ए सी पी गणपती गुडाजी काकती पोलीस निरीक्षक गुरुनाथ घटनास्थळी जाऊन पहाणी केली होती .या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे.