बेळगाव शहरातील गांधीनगर येथील बेकायदेशीररित्या चालविण्यात येत असलेल्या एका क्लिनिकवर आरोग्य अधिकार्यांनी धाड टाकून त्या क्लिनिकला टाळे ठोकले आहे.
गांधीनगर येथील बेकायदेशीररित्या भरविण्यात येत असलेल्या समृद्धी क्लिनिक या दवाखान्यावर धाड टाकून ते क्लिनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी ‘सीझ’ केले आहे.
आरोग्य खात्याचे नोडल अधिकारी डॉ. एम. व्ही. किवडसन्नावर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवानंद मास्तीहोळी, आरोग्य पर्यवेक्षणाधिकारी मंजुनाथ बिसनहळ्ळी आणि विभागीय कार्यक्रमाधिकारी शंकर देसाई यांनी सदरची कारवाई केली आहे.
अडिवेप्पा आडिनावर ही व्यक्ती खाजगी दवाखान्याच्या खोट्या परवानगी प्रमानपत्राद्वारे सदर क्लिनिक चालवत होती. परिणामी कर्नाटक खासगी वैद्यकीय स्थापना कायद्यान्वये गुन्हा दाखल करून समृद्धी क्लिनिकला टाळे ठोकण्यात आले आहे.