कर्नाटक राज्य उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक शहरात कन्नड गीते विद्यार्थ्यांच्या वतीने गाऊन घेण्याचा उपक्रम कर्नाटक सरकारने सुरू केला आहे. हा उपक्रम बेळगावच्या सुवर्ण विधानसौध च्या पायऱ्यांवर शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राबविण्यात आला.
मात्र याबद्दल वेगवेगळ्या प्रकारे टीकाही होऊ लागली आहे. कोविड नियमांचे काय झाले? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
संगीत शिक्षक विनायक मोरे यांच्या नेतृत्वाखाली कन्नड गीते समुदायिकरित्या गाण्यात आली .या उपक्रमात सुवर्ण विधानसौधच्या पायऱ्यांवर हजार विद्यार्थी उपस्थित होते.
बेळगाव शहर आणि परिसरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले होते. कन्नड नाडगीतच्या बरोबरीनेच चित्रपट गीते यावेळी गाण्यात आली.
बेळगावचे जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ आणि इतर अधिकारी उपस्थित होते .कार्यालयीन आणि प्रशासकीय कामकाजात दैनंदिन स्वरूपात कन्नड भाषेचा अवलंब काटेकोरपणे केला जाईल. अशी ग्वाही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
1 नोव्हेंबर 1956 रोजी तत्कालीन मैसूरू राज्याची स्थापना झाली त्यामुळे संपूर्ण कर्नाटक राज्यात राज्योत्सव साजरा केला जातो. या वर्षी या निमित्ताने शाळकरी विद्यार्थ्यांच्या वतीने कन्नड गीते गाण्याचा उपक्रम राबविला जात आहे.