Sunday, January 5, 2025

/

घर कोसळून सात जण ठार

 belgaum
घर कोसळल्याने सात जणांचा मृत्यू झाला -बेळगाव तालुक्यातील बडाल अंकलगी गावात  पाच जण घर कोसळून जागीच ठार झाले आहेत तर दोघांचा उपचाराला नेत असताना मृत्यू झालाय.सायंकाळी  साडे सातच्या दरम्यान ही घटना घडली आहे.
बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बडाल अंकलगी गावातील भीमाप्पा खनगावी यांचे घर कोसळले. त्यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आणि इतर तीन जण गंभीर जखमी झाले होते त्यात दोघा जखमींना हिरेबागरवाडी येथील इस्पितळात उपचारासाठी नेताना  मृत्यू झाला.
सात मयतापैकी खनगावी कुटुंबातील सहा जण आणि शेजारच्या कुटुंबातील एक असे सात जण या घटनेत दगावले आहेत.
हिरेबागेवाडी पोलिसांनी व अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले . पोलीस निरीक्षक विजय शिंनूर यांच्या नेतृत्वाखाली बचाव कार्य केले बुधवारी झालेल्या पावसाने घर कोसळले असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.
गंगाव्वा भिमाप्पा खनगावी वय 50, सत्यव्वा अर्जुन खनगावी वय 45,पूजा अर्जुन खनगावी वय 8 ,सविता भिमाप्पा खनगावी वय 28,काशव्वा विठ्ठल कोळेपनांवर वय 08 ,लक्ष्मी हणमंत खनगावी वय 15,आणि अर्जुन हणमंत खनगावी वय 45 सर्वजण रहाणार ब अंकलगीचे रहिवाशी अशी मयतांची नावे असून आहेत.

झाड पडून वाहतूक ठप्प

बुधवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव वेंगुर्ला महामार्गावर झाड पडून वाहतूक ठप्प झाली. अरगन तलावाजवळ झाड पडल्यामुळे वाहतूक ठप्प होण्याचा प्रकार घडला आहे. लागलीच या भागात पोलिस आणि इतर कर्मचारी दाखल झाले असून तुटलेले झाड बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बेळगाव वेंगुर्ला महामार्गावर कर्नाटक आणि महाराष्ट्र या दरम्यान वाहतूक होत असते. त्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यामुळे लवकरात लवकर पडलेले झाड काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
सोसाट्याचा वारा विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस झाल्यामुळे वातावरण बदलले अशातच वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे ठीक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत .बेळगाव वेंगुर्ला महामार्गावर पडलेल्या झाडामुळे वाहतुकीला प्रचंड मोठा अडथळा निर्माण झाला असून तो दूर करण्याचा प्रयत्न बेळगाव प्रशासनाने सुरू केला आहे.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.