Friday, January 24, 2025

/

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार : बेळगावात आंदोलन

 belgaum

बांगलादेशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात होणारे अत्याचार रोखण्याकरिता आणि त्यांना संरक्षण देण्यासाठी भारत सरकारला प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने आज हिंदू जनजागृती समितीच्यावतीने शहरातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात आंदोलन छेडण्यात आले.

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने ध. संभाजी चौक येथे छेडण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये शहरातील विविध हिंदुत्ववादी संघटना देखील सहभागी झाल्या होत्या. आंदोलनादरम्यान बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या आणि हिंदू देव-देवतांच्या मूर्ती उद्ध्वस्त करणाऱ्या धर्मांधांच्या निषेधाच्या घोषणा देण्याबरोबरच भारत माता की जय, हर हर महादेव, हिंदू एकजुटीचा विजय असो आदी घोषणा देण्यात येत होत्या. यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हातात धरलेले फलक सार्‍यांचे लक्ष वेधून घेत होते.

आंदोलनाच्या शेवटच्या सत्रात हिंदू जनजागृती समितीचे ऋषिकेश गुर्जर यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यांनी बांगलादेशातील ज्वलंत क्रूर व जिहादच्या घटनांची थोडक्यात माहिती दिली. बांगलादेशात जवळपास 1500 हिंदूंची घरे जाळण्यात आली असून 12 हून अधिक हिंदूं व्यक्तींच्या कत्तली करण्यात आल्या आहेत. तसेच दोन साधूंना ठार देखील करण्यात आले आहे.Hindu janjagran samiti

तसेच एका बालकाची निर्घुण हत्या करून त्याचे अवयव इतस्ततः फेकण्यात आले आहेत. नवरात्रोत्सवाचा पार्श्वभूमीवर बांगलादेशीमधील दुर्गा मातेच्या मुर्त्या फोडण्यात आल्या आहेत. सध्या बांगलादेशमध्ये हिंदू धार्मियांवर प्रकर्षाने धर्मांधांचा रोष पत्करत येत आहेत. तेथील सरकारच्या म्हणण्यानुसार हिंदूंना रक्षण देण्यात येत आहे. मात्र त्याठिकाणी दंगली सुरूच आहेत.

याला आळा बसण्याकरिता भारत सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी तेथील पंतप्रधानांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन करावे. त्याचप्रमाणे भारताकडून बांगलादेशाला जी मदत अथवा रसद पुरवली जाते ती तात्काळ बंद करावी. जोपर्यंत तेथील हिंदूंना संरक्षण मिळत नाही तोपर्यंत बांगलादेशाला मदत करू नये. यासाठीच हिंदू जनजागृती समितीने आजचे आंदोलन छेडल्याचे ऋषिकेश गुर्जर यांनी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.