पाटबंधारे मंत्री गोविंद कारजोळ यांनी कळसा भांडुरा प्रकल्पाबद्दल आज बेळगावात विधान केले आहे. राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी कळसा-भांडुरा कालवा प्रकल्पाचे काम हाती घेईल.अशी ग्वाही त्यांनी दिली.
बुधवारी येथे बातमीदारांशी बोलताना ते म्हणाले की, सरकार कामाचा आराखडा तयार करत आहे. कोर्टाने निकाल दिल्यानंतर हा आराखडा कार्यान्वित केला जाईल.
पाणी वाटप न्यायाधिकरणाने 13.4 टीएमसी पाणी राज्यासाठी राखीव ठेवले आहे, त्यापैकी 5 टीएमसी पिण्याच्या हेतूसाठी आणि उर्वरित भाग वीज निर्मितीसाठी वापरला जाईल.
2015 मध्ये राज्याला पर्यावरण विभागाकडून या प्रकल्पासाठी मंजुरी मिळाली होती, मात्र, गोवा आणि महाराष्ट्राने या प्रकल्पाला आक्षेप घेतला आणि न्यायालयात दावा दाखल केला. कर्नाटकनेही या प्रकरणी रिट याचिका दाखल केली आहे. जर राज्याच्या बाजूने निकाल आला तर हा प्रकल्प दुसऱ्या दिवशी हाती घेतला जाईल.
कुमारस्वामींनी एखाद्याला खुश करण्यासाठी आर एस एस बद्दल विधान दिले असावे. आरएसएस ही एक देशभक्त संघटना आहे, कुमारस्वामी आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी अशा खोट्या शेरेबाजी करणे थांबवावे.
ते म्हणाले की, म्हैसूर येथे दसरा साजरा करण्यासाठी लागू करण्यात आलेले नियम 21 ऑक्टोबरपासून तीन दिवस साजरा होणाऱ्या कित्तूर उत्सवासाठीही लागू असतील. शासकीय निर्देशानुसार केवळ 500 जण एकत्रित येऊ शकतात त्यामुळे कित्तुर उत्सव आणि राजयोत्सव शासकीय नियमानुसार होतील असे कारजोळ म्हणाले.