बेळगाव जिल्ह्यातील गोकाक धबधब्यावर मध्यरात्री ही आश्चर्यकारक घटना घडली. 140 फूट खोल खडकात पडलेला तरुण वाचला आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या तरुणाची बचाव करून सुटका केली आहे.
काल संध्याकाळी 7 च्या सुमारास तो तरुण सेल्फी काढण्यासाठी गेला होता. गोकाक धबधब्यावर सेल्फी काढताना तो पडला होता मात्र आश्चर्यकारकरित्या बचावला असून जीवन एक चमत्कार आहे हे सिद्ध झाले आहे.
प्रदीप सागर हा तरुण 140 फूट खंदकात खडकांमध्ये पडला होता, तो मित्र आणि कुटुंबासह गोकाक धबधबा पाहण्यासाठी गेला होता.
प्रदीप खाली पडताच पोलिसांना त्याच्या जवळच्या मित्रांनी कळवले. घटनास्थळी पोहचलेले गोकाका पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान रात्रीच्या वेळी त्याचा शोध करत होते.
140 फुटांच्या खंदकात काहीकाळ बेशुद्ध पडलेल्या प्रदीपला जाग आली होती मात्र फोनची रेंज देखील मिळाली नव्हती आणि त्याने संपूर्ण रात्र खंदकात घालवली होती.
जेव्हा प्रदीप सागरने सकाळी 4 वाजता स्वतः मित्राला फोन करून त्याला जिवंत असल्याची माहिती दिली.तेंव्हा शोधकर्त्यांना बळ मिळाले.गोकाकचे सामाजिक कार्यकर्ते अयुब खान आणि पोलिसांची एक टीम त्याच्या पर्यंत पोहोचली आणि त्यांनी त्याला सुरक्षित ठिकाणी आणले.