गोवा बनावटीची दारू विक्री करण्यासाठी अवैधरित्या संग्रहित करणाऱ्या एकाला अटक करून जवळपास सव्वा लाख किंमतीची दारू जप्त करण्यात आली आहे.
सी सी बी पोलिसांनी कारवाई करत अटक केलेल्याचे नाव सुभाष डे असे असून तो महाद्वार रोड भागांत रहाणारा आहे.
शनिवारी सी सी बी पोलीस निरीक्षक निंगनगौड पाटील आदी सहकाऱ्यांनी सुभाष यांच्या घरी धाड टाकून संग्रहीत केलेल्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या.
इंपेरियल ब्लु आणि रॉयल स्ट्रॉंग (विस्की) ब्रँडच्या 750 मिलीच्या 64 बाटल्या, रॉयल चॅलेंजच्या 750 मिलीच्या 9 बाटल्या सह इतर ब्रॅंड 134 लिटरच्या 188 बाटल्या जप्त केल्या त्याची किंमत 1 एक लाख वीस हजार शंभर रुपये आहे.या प्रकरणी मार्केट पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.