कर्नाटकातील मांस व्यापाऱ्यांकडून मिळणारे 2,100 किलो गोमांस दररोज गोव्यात खाल्ले जाते, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी राज्याच्या विधानसभेत सांगितले.
गोवा विधानसभेच्या चालू असलेल्या दोन दिवसांच्या अधिवेशनात सादर केलेल्या प्रश्नावर काँग्रेसचे आमदार अलेक्सो रेजिनाल्डो यांना लिखित उत्तर देताना मुख्यमंत्री सावंत यांनी असेही सांगितले की, गेल्या सहा महिन्यांत कर्नाटकातील व्यापाऱ्यांकडून 388 टन गोमांस गोव्यात खरेदी केले गेले.
“सक्षम अधिकाऱ्यांकडून गोळा केलेल्या मांस तपासणी शुल्काच्या आधारे सरासरी दररोज कर्नाटकातून 2,120 किलो गोमांस मिळते,”असे प्रमोद सावंत म्हणाले.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, गोव्यामध्ये विकल्या जाणाऱ्या गोमांसाची किंमत 3.27 लाख रुपयांपासून 3.75 लाख रुपयांपर्यंत असताना, कर्नाटकातून गेल्या सहा महिन्यांत 388 टन गोमांस स्थानिक गोमांस व्यापाऱ्यांनी खरेदी केले आहे. कत्तल केलेले गोमांस गुरे ढोरे अर्थात गाय आणि म्हैस यामधून घेतले गेले.
कर्नाटक विधानसभेने नुकतेच कर्नाटक प्रतिबंधक कत्तल प्रतिबंध आणि गुरांचे संरक्षण विधेयक मंजूर केल्यानंतर गोव्यात गोमांस टंचाई निर्माण झाली होती. यापूर्वी महाराष्ट्रातही असाच कायदा मंजूर झाल्यानंतर कर्नाटक गोव्याला ताजे गोमांस आणि पशुधनाचा एकमेव मोठा पुरवठादार होता.गोव्यातील गोमांस खाणारे अल्पसंख्यांक समुदाय राज्याच्या लोकसंख्येमध्ये 30 टक्क्यांहून अधिक आहेत.