एखाद्या व्यक्तीने गांजा खाल्ले आहे की नाही हे तपासण्यासाठी कर्नाटक पोलिसांनी एक डिव्हाईस अर्थात चाचणी किट वापरण्यास सुरुवात केली आहे.जर ते पॉझिटिव्ह आढळले तर तात्काळ 10,000 रुपये दंड आणि सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.
कर्नाटकात काल पहिल्या दिवशी शिवमोग्गा पोलिसांनी दोड्डापेटे पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गुन्हे दाखल केले.याप्रकारे संपूर्ण राज्यात हे डिव्हाईस वापरले जाणार आहेत.
पोलिस अधीक्षक बीएम लक्ष्मी प्रसाद म्हणाले की, जिल्ह्यात गांजाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर पोलिसांनी चाचणी किट वापरण्याचा निर्णय घेतला आहे. चाचणीसाठी लघवीचे नमुने गोळा केले जातील. त्याच्या आधारे अशा व्यक्तींवर गुन्हे दाखल केले जातील. चाचणीत घेतलेल्या अंमली पदार्थाचा प्रकार देखील उघड होईल.
ते म्हणाले की, किटच्या वापराबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली आहे आणि शहरातील जिल्हा मॅकगॅन टीचिंग जनरल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी पोलिसांच्या फायद्यासाठी प्रात्यक्षिके आयोजित केली आहेत.
आता संपूर्ण राज्यभरात याची अंमलबजावणी होणार असून गांजा व इतर अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यक्तींवर चाप बसणार आहे.