कर्नाटकात रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
या संदर्भातील तपशील राष्ट्रीय भूकंपमापन केंद्राने प्रसिद्ध केला असून या संदर्भातील एक ट्विट केले आहे.
कर्नाटकातील गुलबर्गा येथे हे धक्के बसले असून त्या संदर्भातील तपशील प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे कोणतीही हानी झाली आहे
की नाही याबद्दलची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नसली तरी भूकंपमापन केंद्राला या भूकंपाची माहिती मिळाली असून पुढील अभ्यास सुरू आहे.
3.4 मॅग्नीट्युडचा हा भूकंप असल्याची माहिती देण्यात आली आहे.