तोडगा गुपित ठेऊन वाटचालीस पाठिंबा कसा ध्यायचा असा सवाल मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी सीमा प्रश्नाविषयी तोडगा काढण्यास निघालेल्या दिगंबर पाटील यांना खडा सवाल केला आहे.
तुम्ही तोडगा जाहीर करा तो तोडगा सीमाभागातील जनतेला मान्य असेल तर कोण तुमच्या मागे उभा राहत नसेल तर मी मध्यवर्ती अध्यक्ष तुमच्या मागे उभे राहीन पण 65 वर्षा पासून बेळगाव प्रश्नी लढणाऱ्या जनतेची फसवणूक करता येणार नाही.सीमा लढा हा आमच्या काळजा भोवती पडलेला पीळ आहे,तो सैतान जरी सोडवत असेल तर त्याला आम्ही नमस्कार करायला तयार आहे.
महाराष्ट्र एकीकरण समिती सर्वांची आहे, ती कार्यकर्त्यांच्या निर्णयावर चालते त्यामुळे तुमचा तोडगा उघड करा लढ्याला बाधा येत नसेल तर संघटितपणे कार्य करू,असाही टोला दळवी यांनी खानापूरच्या माजी आमदारांना लगावला.महाराष्ट्रात जाऊन नेत्यांच्या गाठीभेटी घ्यायच्या इथं मात्र सर्वांना अंधारात ठेवायचे याने काहीही साध्य होणार नाही असेही दळवी म्हणाले.
रविवारी झालेल्या बैठकीत रणजित हावळाणाचे आणि नितीन खन्नूकर या दोघांनी व्यवहार्य तोडगा काढा म्हणणाऱ्या माजी आमदारांना आवरा अशी मागणी केली होती त्यावर दळवी यांनी दिगंबर पाटील यांना उघड आवाहन दिले आहे.