सातत्याने विविध सामाजिक कार्यात व्यस्त असणाऱ्या शहरातील सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनतर्फे दसरा सणानिमित्त आज सिव्हील हॉस्पिटल आवारात गरीब गरजू लोकांना मिठाई आणि पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करण्यात आले.
दसरा सणानिमित्त घरोघरी गोडधोड पदार्थ केले जातात. सणानिमित्त सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण असते. मात्र या सर्वांपासून गोरगरिब तसेच ज्यांचे आप्तस्वकीय हॉस्पिटलमध्ये जीवन मरणाशी झुंज देत आहेत असे लोक वंचित असतात.
हे लक्षात घेऊन अशा लोकांचे कांही क्षण सुखद करण्यासाठी सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनतर्फे सिव्हील हॉस्पिटल आवारातील फुड फाॅर नीडी काउंटरच्या ठिकाणी आज सकाळी गरीब गरजू लोकांना मिठाई आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करून दसरा सण साजरा करण्यात आला.
सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर यांच्या नेतृत्वाखाली शितल मठपती, दीपक पांडे, कीर्ती चौगुले आणि संतोष यांनी विशेष परिश्रम घेतले.