बेळगावच्या राज्योत्सव मिरवणुकीला परवानगी द्यायची की नाही हे तज्ञांशी विचार करूनच ठरवणार असल्याचे प्रतिपादन कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज बेळगाव विमानतळावर केले.
सिंदगी मतदारसंघातील प्रचार उरकून आपण बेंगळूरला निघालो आहे. आणखी दोन दिवस हनगल येथे प्रचार करून 23 तारखेला कित्तुर उत्सवाच्या निमित्ताने पुन्हा बेळगावला येणार असून दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपचा विजय निश्चित आहे. असे त्यांनी सांगितले.
यावेळी पत्रकारांनी कन्नड संघटना राज्योत्सव मिरवणुकीच्या परवानगी वरून आक्रमक होत असून परवानगी का नाही? असा प्रश्न उपस्थित केला, दरम्यान परवानगीचा मुद्दा कोविड नियमावली वर आधारित आहे.
तज्ञांशी चर्चा करूनच या संदर्भात योग्य ते निर्णय घेतले जातील. असे त्यांनी सांगितले. बेळगाव विमानतळावरून आज सकाळी आठ वाजता ते पत्रकारांशी बोलत होते.
कानडी संघटनांनी बेळगावात राजयोत्सव मिरवणुकीला परवानगी मिळावी यासाठी जोरदार मागणी केली आहे त्या पाश्वभूमीवर मुख्यमंत्री बोम्मई यांनी चेंडू तज्ञ कमिटीकडे टाकला आहे. त्यामुळे परवानगी दिली तर राज्योत्सव आणि काळा दिन अश्या दोन्हीला परवानगी द्यावी लागणार आहे.