बेळगाव सिटीझन फोरम तर्फे आज अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव रेल्वे स्टेशनचे नवनियुक्त स्टेशन व्यवस्थापक पी. नागराज यांची भेट घेण्यात आली.त्यांच्याकडे दसरा आणि दिवाळी सणांच्या निमित्ताने स्पेशल रेल्वे सेवांची मागणी करण्यात आली आहे.
त्यांच्या माध्यमातून रेल्वे मंत्रालय आणि जीएम एसडब्ल्यूआर यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
दसरा आणि दिवाळी दरम्यान हॉलिडे स्पेशल ट्रेन हुबळी विभागाने सुरू करावी अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
प्रारंभी पी. नागराज यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला.नूतन स्टेशन व्यवस्थापक म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.क्लोन ट्रेन सुरू करण्याची मागणीही प्रतिनिधींनी केली.
पी. नागराज यांनी कौन्सिलला आश्वासन दिले की ते आपल्या पदाचा वापर समस्या सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील.
परिषदेने केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.सार्वजनिक वाहतूक समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले
यावेळी डी अनिलकुमार, शेवंतीलाल शहा, श्री एस. सुरेश माजी एसएमआर बीजीएम, अरुण कुलकर्णी, विकास
कलघटगी आदी उपस्थित होते.