Saturday, December 21, 2024

/

भारतीय संघाच्या कर्णधारपदी बेळगावचा बुद्धिबळपटू

 belgaum

दिव्यांगांच्या (अंध व अपंग) बुद्धिबळ ऑलंपियाडसाठी बेळगावच्या निरंजन नवलगुंद यांची भारतीय अंध बुद्धीबळ संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.

अंधांसाठीच्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या 16 व्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेसाठी (ऑलंपियाड) बेळगावच्या बुद्धिबळपटूला अशाप्रकारे प्रथमच भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. अंध बुद्धिबळ ऑलंपियाड येत्या 16 ते 27 ऑक्टोबर दरम्यान ग्रीसमधील रोड्स बेटावर होणार आहे. भारतीय अंध बुद्धीबळ संघामध्ये आर्यन जोशी, सौंदर्या प्रधान, दर्पण इनानी, मरिमुथ्थू आणि मिलिंद सामंत यांचा समावेश आहे. निरंजन नवलगुंद हा कर्णधारपद सांभाळण्याबरोबर आहेत प्रशिक्षकाची भूमिका देखील पार पडणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.