बेळगावात होणाऱ्या साहित्य संमेलनावर आघात करणाऱ्या कर्नाटकी प्रशासनाला मराठी साहित्यानेचं कडवे उत्तर दिलं आहे मराठीची मुस्कटदाबी करण्यासाठी कुद्रेमनी साहित्य संमेलन आयोजकावर सूड बुद्धीने पोलिसांनी दाखल केलेला खटला न्यायालयाने रद्दबातल ठरवला आहे त्यामुळे कर्नाटक प्रशासन आणि पोलिसांना चपराक मिळाली आहे.
2020 साली कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील कुद्रेमनी गावात श्री बलभीम साहित्य संघाच्या वतीनं साहित्य संमेलना आयोजन दरवर्षी प्रमाणे केले होते या संमेलनात भाषिक तेढ करणारी भाषणे केली जातात असा आरोप करत तत्कालीन काकती पोलीस निरीक्षक श्रीशैल कौजलगी यांनी तक्रार दाखल केली तत्कालीन डी सी पी सीमा लाटकर यांच्याकडे तक्रार नोंदवत त्यांच्या न्यायालयात सुनावणी झाली होती.
या संमेलन आयोजकांना पोलिसांनी धमकावत संमेलन बंद करण्याचा प्रयत्न केला होता संयोजकावर गुन्हे दाखल केले होते 50 हजारांचा जामीन घेण्यात आला होता.आपल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार करून न्याय मागण्याचा अजब प्रकार बेळगाव पोलिसांनीं केला होता पोलिसांनी नागेश राजगोळकर,काशिनाथ गुरव,मोहन शिंदे मारुती गुरव,शिवाजी गुरव गणपती बडसकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.
संमेलनाच्या प्रचंड पोलीस फाटा घेऊन जात दशहत माजवण्याचा अश्लान्घ प्रकार देखील पोलिसांकडून झाला होता.पोलिसांच्या या मनमानी कारभारा विरोधात वकील वकील महेश यांनी म ए समिती श्री बलभीम साहित्य संघाच्या वतीनं जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती आपले पितळ उघडे होईल या भितीने पोलीस कोर्टात आपले म्हणणे मांडायला उशीर करत होते अखेर 11 व्या जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली त्यात डी सी पी सीमा लाटकर यांनी संमेलन आयोजकांची बाजू न ऐकता आदेश बजावला होता पोलिसांनी आपल्याचं अधिकाऱ्यांकडे तक्रार केली ही बाब कायद्याला धरून नाही त्यामुळे तो आदेश एकतर्फी आहे असा आदेश न्यायालयाने काढला.पोलिसांनी मराठी संमेलनात दोन भाषिकांत तेढ निर्माण केला जातो अशी बाजू मांडली पण न्यायालयाने मराठी संमेलनात दोन भाषिकांत तेढ निर्माण केले जात नाही असा निर्वाळा देत सदर याचिका रद्द करत डी सी पी यांनी काढलेला आदेश रद्द ठरवला.
आयोजकां तर्फे वकील महेश बिरजे आणि एम बी बॉंद्रे यांनी काम पाहिले तर संमेलन आयोजक आणि वकिलांचे अभिनंदन समिती नेते आर आय पाटील, वकील सुधीर चव्हाण आणि वकील अमर येळ्ळूरकर यांनी केले.
मराठी भाषेने वनवास भोगत आगीत तावून सुलाखून झळझळीत यश प्राप्त केले मराठी भाषेने साहित्य शारदेच्या प्रांगणात आपले न्याय मागणी सिद्ध केले मराठी भाषेचा हा विजयी पुढे लागणाऱ्या सुप्रीम कोर्टातील विजयाची नांदी आहे असा विश्वास मराठी जनता व्यक्त करत आहेत.इथून पुढे होणाऱ्या साहित्य संमेलना कडे वक्र दृष्टी ठेवणाऱ्या कानडी पोलिसांना चांगलाच चाप बसेल यात तीळ मात्र शंका नाही.