समिती कार्यकर्त्यांवर रहदारीला अडथळा, कोविड नियम न पाळल्यामुळे गुन्हा

0
5
Mes protest
 belgaum

25 ऑक्टोबर रोजी आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढलेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि कार्यकर्त्यांवर दडपशाही सुरूच आहे. आता कॅम्प पोलीस स्थानकात समिती नेते आणि कार्यकर्ते अशा एकूण 26 जणांवर सह अज्ञात 200 जणांवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारी कोविड 19 मार्गदर्शक सुची न पाळणे आणि धर्मवीर संभाजी महाराज चौकात रहदारीला अडथळा आणणे या प्रकारचे आरोप त्या गुन्ह्यात करण्यात आले आहेत.कर्नाटक राज्य एपीडिमिक डिसइज ऍक्ट 2020 नुसार आय पी सी 147,143 आणि 283,149 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

बेळगाव महानगरपालिके समोरील लाल लाल पिवळा ध्वज हटवा आणि त्याच्या बाजूला भगवा ध्वज लावा. सरकारी परिपत्रके मराठी मध्ये द्या. यासारख्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

 belgaum

धर्मवीर संभाजी चौकातून कमीत कमी लोकांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकार्‍यांकडे जाऊन निवेदन द्या असे म्हणत असताना मोर्चा काढला, कॉलेज रोड वर कोविड नियमावलीचा भंग झाला. राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली असा ठपका ठेवण्यात आला आहे.

गुन्हा दाखल केलेल्या प्रमुख 26 जणांच्या यादीत समिती नेते दिपक दळवी,माजी आमदार मनोहर किणेकर,प्रकाश मरगाळे,मदन बामणे,माजी महापौर सरिता पाटील,माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, प्रकाश शिरोळकर,किरण गावडे, शुभम शेळके, धनंजय पाटील,श्रीकांत मांडेकर,नगरसेवक रवी साळुंके,मालोजी अष्टेकर,नेताजी जाधव,बंडू केरवाडकर,गजानन पाटील, संदीप चौगुले,परेश शिंदे, दिगंबर कातकर,विनायक सांबरेकर,हणमंत मजुकर,विनायक पावशे,रामचंद्र कुद्रेमनीकर, नागेश किल्लेकर उदय नाईक आदींचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.