बेळगावात सीमावासीयांच्या काळ्या दिनाला परवानगी मिळाली नाही. मात्र विविध मागण्यांसाठी कर्नाटकात शिक्षक काळा आठवडा पाळणार आहेत.आज दि 21 ते 29 ऑक्टोबर दरम्यान शाळांमधील शिक्षण उपक्रमांमध्ये भाग घेताना विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शिक्षक काळी फीत घालतील, असे कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघ अध्यक्ष एच एन मंजुनाथ यांनी सांगितले.
शिक्षक संघटना सी आणि आर नियमांमध्ये बदल करण्याची, बदल्यांवरील वाद सोडवण्याची आणि मुख्याध्यापकांना पदोन्नती आणि एनपीएस रद्द करण्याची मागणी करत आहे.
मात्र, त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. म्हणून, उपक्रमांमध्ये भाग घेताना शिक्षक काळी फीत घालून निषेध करतील.कर्नाटकातील शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यावर मार्ग काढण्यात कर्नाटक सरकार अपयशी ठरत असून याकडे लक्ष वेधण्यासाठी हा अभिनव मार्ग शिक्षकांनी निवडला असल्याची माहिती देण्यात आली आहे.