ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न एका युवकाला चांगलाच महागात पडला आहे. ओव्हरटेक करत असलेला युवक दुचाकीवरून पडला त्यानंतरडोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने जागीच ठार झाला.
ही घटना बुधवारी सायंकाळी अशोक नगर येथील कॅन्सर हॉस्पिटल समोर घडली. निखिल गिलबट चिनिया जॉवेल (वय 30) रा. शिवबसव नगर असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
आपल्या मित्राची मोटरसायकल होंडा शाइन घेऊन काही कामासाठी गेला होता. अशोकनगर कॅन्सर हॉस्पिटल नजिक येताच अडचणीच्या जागेतून ट्रकला ओव्हरटेक करतेवेळी तोल जाऊन पडल्याने ही घटना घडली आहे.
त्याच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने तो जागीच ठार झाला. दुचाकीच्या गाडी नंबर वरून वाहन मालकाला संपर्क साधण्यात आला यानंतर मयत झालेल्या युवकाची ओळख पटली. या युवकाचा मृतदेह जिल्हा इस्पितळातील शवागृहात ठेवण्यात आला आहे. या घटनेची नोंद रहदारी उत्तर पोलीस स्थानकात झाली आहे.