गरज सावधगिरी बाळगण्याची-मृत्युंजय नगर अनगोळ येथे
दुर्गा स्विमिंग पूलच्या चौकात उत्तरेकडून जाणाऱ्या बी एम डब्ल्यू ने पूर्वेकडून जाणाऱ्या वेरणा ला बाजूने धडक दिल्याने वेरणा पलटी होऊन दुर्गा स्विमिंग पूलच्या कुंपणाच्या आत शिरली.
या अपघातात वेरणा मध्ये समोर बसलेल्या महिलेच्या डाव्या हाताला दुखापत झाली.मागील काही दिवसात याच जागी अनेक अपघात घडत आहेत. या मागेही दोन कारची टक्कर झाली होती. तसेच दुचाकी अपघात ही झालेत.
स्मार्ट सिटी अंतर्गत पेवर्सच्या रस्त्यामुळे दुचाकी घसरून पडून अपघात होत आहेत.तसेच वाहन चालकांच्या हलगर्जी पणामुळे व स्पीड ब्रेकर्सच्या अभावी दोन्ही कडून येणाऱ्या वाहनांची टक्कर होऊन अपघात होत आहेत.
वाहन चालकांनी काळजीपूर्वक वाहन चालवावे. क्रॉस असलेल्या ठिकाणी दोन्ही कडे पाहून सावकाश वाहने चालवावी.ही गरज जागरूक नागरिकांनी व्यक्त केली आहे.