बेळगाव शहरातील शाळा कॉलेजीस सुरू झाल्या आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी शाळा -कॉलेज व्यवस्थापन आणि पालकांना कांही सूचना केल्या असून त्यांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.
मुलांना शाळेला ने-आण करणाऱ्या ऑटोरिक्षा, मॅक्सीकॅब आदी वाहनांच्या चालकांनाही सूचना करण्यात आली आहे. त्यांनी रहदारी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. ऑटोरिक्षा अथवा संबंधित वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी विद्यार्थिनींची वाहतूक करू नये.
पालकांनी मुलांना दुचाकीवरून नेताना त्यांना देखील हेल्मेट परिधान करावे. मुलांना ने-आण करणाऱ्या खासगी वाहन चालकांकडील ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट आदी आवश्यक कागदपत्रांची शाळा व्यवस्थापनाने खातरजमा करून घ्यावी.
येत्या कांही दिवसात सदर नियमांबाबत पोलिसांकडून विशेष मोहीम उघडण्यात येणार आहे. याअंतर्गत पोलीस अधिकारी अचानक तपासणी सुरू करून पाहणी करतील.
तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिस आयुक्तांकडून जारी करण्यात आलेल्या सूचना पत्रामध्ये नमूद आहे.