पुनीत राजकुमार यांच्या निधनामुळे कन्नड संघटना करणार साधा राज्योत्सव-कन्नड सुपरस्टार राजकुमार यांचे सुपुत्र अभिनेते पूनित कुमार यांच्या अकाली निधनामुळे शोक व्यक्त केला जात आहे.
नेमके याच कारणामुळे बेळगाव आणि परिसरातील कन्नड संघटनांनी राज्योत्सव जोरदार करण्याचा आपला निर्णय मागे घेतला असून यावर्षी पुनीत राजकुमार यांच्या निधनाच्या शोकाबद्दल अतिशय साध्या पद्धतीने उत्सव साजरा करू अशी माहिती दिली आहे.
कन्नड संघटनांचे नेते अशोक चंदरगी यांनी पत्रकारांना ही माहिती दिली आहे .सीपीएड मैदानावर मोठ्या प्रमाणात उत्सव करण्याची तयारी सुरू होती. मात्र आता फक्त भुवनेश्वरी देवीच्या फोटोचे पूजन करून हा उत्सव थोडक्यात साजरा केला जाणार असून मोठ्या प्रमाणात कोणताही उत्सव केला जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
राज्योत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय आपण मान्य केला असल्याचे यावेळी कन्नड संघटनेच्या नेत्यानी सांगितले. याचबरोबर कन्नड अभिनेते राजकुमार यांचे सुपुत्र अभिनेते पूनित कुमार यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली व्यक्त करून शोक ही पाळण्यात आला आहे.