नुकतेच सोनी टीव्ही वाहिनीवरील सुपर डान्स स्पर्धेचा प्रथम उपविजेता ठरलेल्या बेळगावच्या पृथ्वीराज अशोका कोगारे यांचा जिल्हा पातळीवर सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी सत्कार करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडागुंटी, श्रीशेल पारगे, यल्लाप्पा कोलकार, किरण कांबळे, रवी कांबळे, राजू कोंगरे, सुदीप कोलकार आदी उपस्थित होते.
पृथ्वीराज ने राष्ट्रीय पातळीवर बेळगावचे आणि तो राहात असलेल्या परिसराचे नाव रोशन केले आहे. त्यामुळे त्याचे कौतुक करावे तेवढे थोडे असल्याचे उद्गार यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी काढले.
जिल्हा पातळीवर त्याचा सत्कार करण्यात आला असून या पुढील काळात त्याच्या यशस्वी जीवनाबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या आहेत . त्याने मिळवलेले यश आम्हाला अभिमानास्पद असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त झाल्या.