Thursday, January 2, 2025

/

…अन्यथा करू सीओडी, सीआयडी चौकशीची मागणी : पठाण

 belgaum

खानापूर येथील अरबाज मुल्ला खून प्रकरणातील मुख्य आरोपीला आम्ही लवकरात लवकर गजाआड करू मात्र तोपर्यंत आपण आंदोलने वगैरे करून पोलीस खात्याची शक्ती खर्ची घालू नये, अशी विनंती जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी केल्यामुळे तूर्तास आम्ही पोलिस प्रशासनाला सहकार्य करणार आहोत. मात्र यात कचुराई झाल्यास आम्ही सीओडी, सीआयडी चौकशीची मागणी करणार आहोत, अशी माहिती एमआयएमचे राज्य सरचिटणीस माजी नगरसेवक लतीफखान पठाण यांनी दिली.

खानापूर येथील अरबाज मुल्ला या युवकाच्या खून प्रकरणासंदर्भात आज शहरात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत प्रसंगी ते बोलत होते. खानापूर येथे गेल्या 28 सप्टेंबर रोजी अरबाज मुल्ला या युवकाचा जो खून झाला या संदर्भात आम्ही गेल्या शुक्रवारी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर करणार होतो. मात्र बेळगाव रेल्वे पोलिसांनी आम्हाला काल बुधवारपर्यंत या प्रकरणाचा छडा लावू असे आश्वासन दिले होते. दरम्यान आता हे प्रकरण जिल्हा पोलिसांकडे वर्ग झाले असल्यामुळे काल आम्ही जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांची भेट घेतली असता त्यांनी तीन दिवसापूर्वी आमच्याकडे अरबाज खून प्रकरण वर्ग झाले आहे. तीन दिवसात आम्ही कांही संशयितांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी शीघ्रतेने तपास सुरू आहे. मात्र पुराव्यासहित तपास पूर्ण करून चार्जशीट दाखल करण्यासाठी आणखी थोडा कालावधी लागणार आहे असे सांगितले आहे. त्याचप्रमाणे आम्ही दोषींना निश्चित गजाआड करू मात्र दरम्यानच्या काळात आपण कृपया आंदोलने वगैरे करू नयेत. तसे झाल्यास पोलिस यंत्रणेवर ताण पडून खुनाच्या तपास कार्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. तेंव्हा आम्हाला या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी थोडी मुदत द्या, असे जिल्हा पोलीस प्रमुख निंबरगी यांनी सांगितले आहे. त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही वाट पाहणार आहोत अन्यथा अरबाज मुल्ला खून प्रकरणाचा तपास सीओडी अथवा सीआयडीकडे सोपविला जावा, अशी मागणी करणार आहोत. तसेच जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा चालू राहील, अशी माहिती माजी नगरसेवक लतीफ खान पठाण यांनी दिली.

पत्रकार परिषदेस वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे राज्य अध्यक्ष तन्वीर हुसेन, बहुजन समाज मुक्ती मोर्चाचे आयुब जकाती आदींसह आजी -माजी नगरसेवक, जमैती उलमाहीनचे सदस्य वगैरे उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.