Saturday, December 28, 2024

/

25 च्या मोर्चाची जय्यत तयारी…

 belgaum

बेळगाव सह सीमाभागातील मराठी माणसाची ताकद दाखवून देण्यासाठी 25 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाची जय्यत तयारी सुरू आहे. विभागवार बैठका घेऊन तसेच एकत्रितपणे उपस्थित राहण्याचा निर्धार व्यक्त करून हा मोर्चा यशस्वी करण्याची तयारी समिती नेते आणि कार्यकर्ते करीत आहेत.

मोर्चासाठी समिती नेतृत्वाने बॅनर तयार केले आहेत. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने तयार करण्यात आलेले बॅनर गावागावात वाटण्यात येत आहेत.

बेळगाव शहर आणि उपनगरी भागाच्या बरोबरीनेच बेळगावचा ग्रामीण भाग, बेळगाव तालुक्यातील विविध भागातून महिला व युवक कार्यकर्ते या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत. त्याच पद्धतीने खानापूर तालुक्यातील जनता ही मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.Mes rally

युवा समिती आणि महिला मोर्चाच्या वतीने खानापुर तालुक्यातील जास्तीत जास्त सदस्य या मोर्चाला उपस्थित राहणार असल्याची माहिती समिती नेत्यांनी दिली आहे.

प्रशासनाने कितीही दबाव आणला तरी मोर्चा यशस्वी करणारच असा निर्धार गावागावात व्यक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.