केंद्रीय संरक्षण मंत्रालयातर्फे 1971 च्या युद्धातील विजयाचे 50 वे वर्ष साजरे केले जात आहे. सदर सुवर्ण विजय वर्षाचा समारंभ बेंगलोर येथील येलहंका विमान तळाच्या ठिकाणी येत्या दि. 22 ते 24 ऑक्टोंबर या कालावधीत आयोजित केला जात आहे.
येलहंका येथील सदर समारंभाचे थेट प्रसारण यूट्यूब चॅनल sscelebratiosindia तसेच दि. 22 ऑक्टो. 2021 ( 15:30 नंतर) http://YouTube.be/gihp9PRISY, दि. 23 ऑक्टो. 2021 ( 09:00 नंतर)
http://YouTube.be/vjYBaQ81WNE, दि. 24 ऑक्टो. 2021 ( 09:00 नंतर) http://YouTube.be/nzHpTahGGBK या लिंकवर उपलब्ध असणार आहे.
तरी समारंभाचा आनंद लुटण्यासाठी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सैनिक कल्याण आणि पुनर्वसन खाते बेळगावचे महासंचालक विंग कमांडर ईश्वर कोडळ्ळी यांनी केले आहे.