बेळगाव महानगरपालिकेच्या 58 प्रभागांसाठी 385 उमेदवार रिंगणात आहेत यासाठी आज शुक्रवारी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. महापालिकेच्या मतदानासाठी शहर उपनगरातील नागरिकांनी चांगला उत्साह दाखविलेला पाहायला मिळत आहे. मात्र प्रभाग पुनर्रचना आणि मतदार यादीतील घोळ हा विषय यावेळच्या महापालिका निवडणुकीतील चर्चेचा आणि चिंतेचा विषय बनला आहे.
निवडणुका जाहीर झाल्यानंतर अनेक मतदारांची नावे यादीत समाविष्ट नसल्याचे दिसून आले. त्याचबरोबर एकाच घरातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या प्रभागात गेल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे महापालिकेच्या निवडणूक आणि मतदाना संदर्भात मतदारांमध्ये प्रचंड संभ्रम पाहायला मिळत होता.
आज प्रत्यक्ष मतदाना प्रसंगी अनेक मतदारांना आपले नाव प्रभाग यादीत समाविष्ट असताना,प्रत्यक्ष मतदान केंद्रावरील यादीत भलतेच नाव असल्याचे दिसून आले आहे.
ऐनवेळी मतदान केंद्रावर उद्भवलेला पेच मतदारांना चक्रावून टाकणारा आहे. महापालिका हद्दीतील विविध ठिकाणी मतदारांना अशाच प्रकारचा अनुभव सकाळपासूनच येत आहे. त्यामुळे मतदारां मधून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.
महापालिका निवडणूक, 415 केंद्रांवर चुरशीने मतदान सुरू
संपूर्ण कर्नाटक व महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव महानगरपालिकेसाठी आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे.बेळगाव शहरातील 415 मतदान केंद्रांवर सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे.महापालिका निवडणुकीच्या रिंगणात तब्बल 385 उमेदवार आहेत.
शहरातील चार लाख 30 हजार आठशे पंचवीस मतदार या निवडणुकीत बेळगाव महापालिकेसाठी 58 नगरसेवक निवडून पाठवणार आहेत. या निवडणुकीसाठी पुरुष मतदारांची संख्या दोन लाख 14 हजार 848 इतकी आहे तर, महिला मतदारांची संख्या दोन लाख 15 हजार 977 इतकी आहे. शहरात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे.
बेळगाव मनपा निवडणूक 2021-सकाळी 9 वाजेपर्यंत 5.39% मतदान-
बहुतांश मतदान केंद्रावर सकाळी गर्दी-सायंकाळी 6 पर्यंत होणार आहे मतदान-58 जागांसाठी 385 उमेदवार रिंगणात-
महाराष्ट्र एकीकरण समिती भाजप काँग्रेस मध्ये होणार टक्कर