Thursday, January 23, 2025

/

पुनश्च सुरू होणार पुणे – अर्नाकुलम साप्ता. स्पेशल एक्सप्रेस

 belgaum

बेळगाव मार्गे धावणारी पुणे -अर्नाकुलम साप्ताहिक स्पेशल एक्सप्रेस रेल्वे पुनश्च सुरू करण्याबरोबरच पनवेल व वडगाव मार्गे धावणारी पुणे अर्नाकुलम एक्सप्रेस स्पेशलची फ्रीक्वेंसी वाढविण्याचा निर्णय रेल्वे खात्याने घेतला आहे.

रेल्वे क्र. 01197 पुणे -अर्नाकुलम साप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल रेल्वे येत्या 25 सप्टेंबरपासून पुण्याहून दर शनिवारी सकाळी 10:10 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी रात्री 3:20 वाजता अर्नाकुलमला पोहोचेल. रेल्वे क्र. 101192 अर्नाकुलम -पुणे साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल रेल्वे 27 सप्टेंबरपासून दर सोमवारी सायंकाळी 6:50 वाजता अर्नाकुलमहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 11:35 वाजता पुण्याला पोहचेल. पुणे -अर्नाकुलम रेल्वेचे बेळगाव रेल्वे स्थानकावर सायंकाळी 06:55 वाजता आगमन होईल. त्याचप्रमाणे अर्नाकुलम -पुणे रेल्वे रात्री 12:08 मिनिटांनी बेळगावला येईल.

सदर रेल्वेचे कर्नाटकात बेळगावसह लोंढा, कॅसलरॉक, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, होन्नावर, मुरुडेश्वर, भटकळ, मूकांबिका रोड बेंदूर, कुंदापूर, उडपी आणि मंगळूर जंक्शन येथे थांबे असतील.

ही रेल्वे 1 टू टायर एसी, 4 थ्री टायर एसी, 11 स्लीपर क्लास, 4 सेकंड क्लास सिटिंग आणि 2 लगेज कम ब्रेक व्हॅनने सुसज्ज असेल. दरम्यान, पनवेल व वडगाव मार्गे धावणारी रेल्वे क्र. 1150 /1149 पुणे -अर्नाकुलम -पुणे साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल रेल्वेची फ्रिक्वेन्सी वाढवून द्वी -साप्ताहिक करण्यात येणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.