जिल्ह्यातील विविध शाळा व पदवी महाविद्यालयातील रिक्त असलेल्या अतिथि शिक्षक व प्राध्यापकांच्या रिक्त असलेल्या जागांबाबत दसऱ्यानंतर अधिसूचना जारी करून जागा भरती केल्या जाणार आहेत.
दरवर्षी अतिथी शिक्षकांची नेमणूक होते. मात्र कोरोनाच्या संकटामुळे 2020 -21 या शैक्षणिक वर्षात फक्त कांही शाळा सुरू राहिल्या. त्यामुळे अतिथी शिक्षकांची भरती झाली नव्हती.
मात्र गतवर्षीच्या तुलनेत यावेळी शाळा लवकर सुरू झाल्या आहेत. कांही दिवसात पहिली ते पाचवी शाळा सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण खात्याला अतिथी शिक्षकांची नेमणूक करावी लागणार आहे.
कांही दिवसापासून सहावी ते दहावी व अकरावी ते बारावी चे वर्ग सुरू झाले आहेत मात्र अनेक शाळा व महाविद्यालयात जागा रिक्त असल्याने अतिथी शिक्षक व प्राध्यापकांची भरती करावी अशी मागणी वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर पावले उचलण्यास सुरुवात झाली असून अधिवेशन संपल्यानंतर किती अतिथी प्राध्यापक व शिक्षकांची नेमणूक करावी याबाबत निर्णय घेतला जाईल आणि दसऱ्यानंतर अधिसूचना जारी करून जागा भरती केल्या जाणार आहेत.