महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला प्रचंड मोठा पराभव पत्करावा लागला. बेळगाव दक्षिण मतदारसंघात रवी साळुंके यांच्या रूपाने एकमेव समितीचा उमेदवार निवडून आला आहे. रवी साळुंखे यांना केवळ 13 मतांचे आधिक्य मिळाले असून फक्त तेरा मताने ते निवडून आले असल्याची माहिती मतांच्या आकडेवारीत स्पष्ट होत आहे .
रवी साळुंखे हे तरुण कार्यकर्ते आहेत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून त्यांनी सुरुवातीपासूनच काम केले आहे .सुरुवातीला राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांनी राजकारण आणि समाजकारणात प्रवेश केला .त्यापूर्वी काही काळ ते शिवसेनेत कार्यरत होते. मात्र सामाजिक कार्य आणि जनतेच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता ही ओळख त्यांनी जपली आहे.
महाराष्ट्र एकिकरण समितीच्या माध्यमातून निवडणुकीला उभे राहिल्यानंतर त्यांना पाठिंबा मिळाला होता. माजी उपमहापौर संजय शिंदे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून निवडणुकीतून माघार घेतली आणि रवी साळुंखे यांच्यासाठी मार्ग खुला करून दिला व दक्षिण विधानसभा मतदारसंघात महानगरपालिकेसाठी महाराष्ट्र एकीकरण समिती तून निवडून गेलेला एकमेव उमेदवार म्हणून आता रवी साळुंखे यांच्याकडे पाहिले जाणार आहे.
दक्षिण भागांतून रवी साळुंके एक तर उत्तर भागातील तीन मराठी भाषिक विजयी झाले आहेत.शिवाजी नगर भागातून 14 मधून शिवाजी मंडोळकर, भांदूर गल्ली प्रभाग 10 मधून वैशाली भातकांडे तर बसवणं कुडची भागातून बसवराज मोदगेकर या तीन जागांवर मराठी भाषिक निवडून आले आहेत तर प्रभाग 9 तहसीलदार गल्ली भागातून अपक्ष पूजा पाटील या मराठी भाषिक निवडून आल्या आहेत.