Monday, December 23, 2024

/

चहाला उकळी : महिला काँग्रेसचे आंदोलन

 belgaum

वाढत्या महागाईच्या निषेधार्थ बेळगाव महिंद्रा कॉंग्रेसतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालय आवारात गॅस सिलेंडरसह स्टोव्ह पेटवून चहा उकळण्याद्वारे अभिनव आंदोलन छेडण्यात आले.

केंद्रातील भाजप सरकारने महागाईचा कहर केला आहे, असा आरोप करत काँग्रेस पक्षाच्या स्थानिक महिला विभागातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आंदोलन छेडण्यात आले. घरगुती गॅस सिलेंडरची अव्वाच्या सव्वा झालेल्या दरवाढीचा निषेध करताना यावेळी महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात बैठक मारून त्या ठिकाणी गॅस सिलेंडरसह स्टोव्ह पेटवून चहाला उकळी आणली.

याप्रसंगी चहावालेको हटाव देश बचाव या घोषणेसह केंद्र सरकारच्या धिक्काराच्या घोषणा देण्यात येत होत्या.Dc protest

केंद्रातील भाजप सरकारने सर्व गोष्टी महाग करून आम्हा सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील केले आहे. आम्ही या ठिकाणी चहा का तयार करत आहोत? याचे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः चहा बनवून विकत होते. आता त्याच मोदींनी गॅस सिलेंडर महाग करून गृहिणींसाठी चहा बनवणे अवघड करून ठेवले आहे. महागाई इतकी वाढली आहे की सध्या खरेदीसाठी बाजारात जायचे तर 500 रुपयांची नोट घेऊन जावे लागत आहे, असे काँग्रेसच्या स्थानिक महिला पदाधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

काँग्रेसच्या समाज कल्याणाच्या योजनाच भाजप नव्या नांवाने राबवत आहे. गॅस सिलेंडरची दरवाढ सर्वसामान्यांना परवडणारे नाही म्हणून आम्ही या दरवाढीचा निषेध करत आहोत असे सांगून केंद्रातील भाजप सरकार बरखास्त करावे, अशी मागणी संबंधित महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.