राजवीर मदकरी नायक ”नावाचा फलक आरपीडी क्रॉसवर लावणाऱ्या तरुणांनी आपण वाल्मीकी समाजातील असल्याचे सांगितले होते, मंगळवारी सकाळी लावलेला तो फलक अनधिकृत ठरवून पोलिसांनी काढून टाकला आहे.
अनुचित प्रकार टाळण्यासाठी आर पी डी सर्कल परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.केएसआरपीची एक पलटन, एक एसीपी, 2 निरीक्षक, 4 उपनिरीक्षक आणि शंभरहून अधिक कॉन्स्टेबल त्या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत.
पोलिसांनी सांगितले की त्यांनी हे फलक मनपाच्या परवानगीशिवाय लावलेले असल्याने काढून टाकले.
काही तरुणांनी मंगळवारी सकाळी कन्नड, इंग्रजी आणि मराठीत अशा तीन भाषेत हा फलक लावला होता.
*आर पी डी क्रॉसजवळ जमले पोलीस*