बेळगावचा गणेश उत्सव राज्यात सर्वात मोठा असतो त्यासाठी तसा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात येतो दरवर्षी बेळगावची विसर्जन मिरवणूक पोलिसांसाठी एक आवाहनचं असते यावेळीही कोरोनाच्या नियमानुसार रात्री आठच्या आत विसर्जन पूर्ण करावे लागणार आहे गणेश मूर्ती सोबत विसर्जन तलावात केवळ दहा कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
पोलीस उपायुक्त विक्रम आमटे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी शहरात 1200 हुन अधिक पोलीस बंदोबस्त तैनात केले जाणार आहेत.60 पी एस आय,40 पोलीस निरीक्षक,8 ए सी पी ,8 के एस आर पी तुकड्या,8 सी ए आर तुकड्या असणार आहेत.
या शिवाय शहरात अतिसंवेदनशील भागात विशेष लक्ष रहाणार असून अधिक पोलीस या ठिकाणी तैनात केले जाणार आहेत.सकाळी 10 वाजता ते सायंकाळी 5 च्या आत विसर्जन पूर्ण करावे असे आवाहन पोलिसांनी केलं आहे .
कोणतीही मिरवणूक काढू नये जवळच्या विसर्जन तलावात मूर्ती विसर्जित कराव्यात कोरोनाचे नियम पाळावेत व डॉल्बी बँड लावू नयेत असे आवाहन पोलीस उपायुक्त विक्रम आमटे यांनी केलं आहे.