धर्मादाय खात्याच्या अखत्यारित येणाऱ्या मंदिरांची माहिती आता ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. इंटिग्रेटेड टेम्पल मॅनेजमेंट सिस्टीमच्या (आयटीएमएस) सहाय्याने आता मंदिरापर्यंत पोहोचण्याचा नकाशा, तेथील सेवा, मंदिराची संपत्ती आदी सर्व माहिती अल्पावधीत ऑनलाईन उपलब्ध केली जाणार आहे.
धर्मादाय खात्याच्या अखत्यारित येणाऱ्या मंदिरांची पूर्ण माहिती आजवर उपलब्ध नव्हती. ती माहिती उपलब्ध व्हावी तसेच मंदिर प्रशासनात पारदर्शकता राखण्यासाठी तसेच मंदिरांची सेवा तातडीने मिळावी हा मंदिराची माहिती ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा मुख्य उद्देश आहे.
त्यासाठी आयटीएमएस सेवा सुरू करण्याची तयारी सुरु झाली आहे. राज्यात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यांच्या संपत्तीची माहिती अद्याप उपलब्ध नव्हती. बेळगावसह राज्यभरात अनेक प्राचीन मंदिरे असून त्यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. त्या मंदिरांचे दाखले व इतर माहिती आता ऑनलाइन उपलब्ध करून दिली जाणार आहे.
मंदिरामध्ये सुरू असणारी दिनचर्या आणि इतर माहिती देखील ऑनलाईन उपलब्ध असणार आहे. त्यासाठी धर्मादाय खात्याच्या प्रत्येक मंदिरात इ
ई -ओफिस, वेब बेस्ड अप्लिकेशन सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिली जाणार आहेत. याच बरोबर देणगी देखील स्वीकारली जाणार आहे. राज्यात आणि परराज्यात राहणाऱ्या भाविकांना यापूर्वी मंदिरासाठी देणगी पाठवायचे असल्यास पोस्ट कार्यालयात जाऊन मनीऑर्डर फॉर्म भरावा लागत होता.
तथापि आता ऑनलाइन सुविधेमुळे ‘ई -हुंडी’ या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे ऑनलाईन देणगी दिली जाऊ शकते. मंदिरांसाठीची ऑनलाईन सेवा सुरू झाल्यास मोबाईल ॲप आणि वेब पोर्टलद्वारे घरबसल्या भक्तांना मंदिराची संपूर्ण माहिती मिळणार आहे. तसेच मंदिरातील सेवेचे ऑनलाईन बुकींगही करता येणारा आहे.