जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार शहर आणि उपनगरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विविध प्रकारचे परवाने देण्यासाठी महापालिकेकडून शहरातील आठ पोलिस स्थानकांमध्ये ‘एक खिडकी’ सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे परवानगीसाठी विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती देखील करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या सूचनेनुसार शहरातील 8 पोलिस स्थानकांमध्ये ‘एक खिडकी’ सुरू करण्यात आल्याने गणेशोत्सव मंडळांची चांगली सोय झाली आहे. प्रत्येक पोलिस स्थानकात महापालिकेतर्फे दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संबंधित पोलिस स्थानकाच्या व्याप्तीतील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांनी महापालिका व पोलिसांकडून परवानगी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. ‘एक खिडकी’ व्यवस्था असणाऱ्या पोलीस स्थानकांचा संपर्क क्रमांकासह तपशील खालील प्रमाणे आहे.
टिळकवाडी पोलीस स्थानक महादेव गुंजीगाव (9956692090), गोपाळ सुक्ते (7975282560). मार्केट पोलीस स्थानक महादेव नाईक (9886669962) बी. पी. मेत्री (9482543710). खडेबाजार पोलिस स्थानक रणजीत कोवाडकर (903695200), गजानन बनगे (9902407544),
रमेश कोणी (9742709007). कॅम्प पोलिस स्थानक अमित गंथडे (9886056388), रंगस्वामी के. एस. (8618725894). माळमारुती पोलीस स्थानक अण्णाप्पा नाईक (9740256290), मंजुनाथ गडाद (8150085178). शहापूर पोलीस स्थानक संतोष कांबळे (9740340171), रवी मास्तीहोळीमठ (7760555850). एपीएमसी पोलीस स्थानक नागेश कल्पत्री (9481911560), किरण मन्निकेरी (9449731560).