Tuesday, December 24, 2024

/

लांब पल्ल्याची वातानुकूलित बससेवा झाली प्रारंभ

 belgaum

निवळलेला कोरोना प्रादुर्भाव आणि स्थानिक प्रवाशांसह लांब पल्ल्याच्या प्रवासी संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन वायव्य कर्नाटक राज्य परिवहन मंडळाकडून आता लांब पल्ल्याच्या वातानुकूलित (एसी) आराम बसेस सुरू करण्यात आल्या आहेत.

गणेश चतुर्थी जवळ आल्याने लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. बेंगलोर, म्हैसूर, मुंबई, नाशिक येथून येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली असल्यामुळे वातानुकुलीत व आराम बसेसना प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळेल अशी परिवहन मंडळाला आशा आहे. त्यामुळे बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकातून बेंगलोर, मंगळूर, म्हैसूर, नाशिक, हैदराबाद, चेन्नई, तिरुपती, मुंबई आदी शहरांकडे वातानुकूलित आराम बस गाड्या सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे लांब पल्ल्यासाठी रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला आहे.

मागील दोन वर्षात परिवहन मंडळाला कोरोनामुळे प्रचंड प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे विस्कटलेली आर्थिक घडी बसविण्यासाठी परिवहन मंडळ उत्पन्नवाढीसाठी कसोशीने प्रयत्न करत आहे.

गेल्या जूनपासून जिल्हांतर्गत व राज्यांतर्गत बस सेवेला प्रारंभ झाला होता. मात्र वातानुकूलित बसेस रस्त्यावर धावल्या नव्हत्या. आता प्रवासी संख्येत वाढ होत असल्याने विविध मार्गांवर आराम बसेस धावणार आहेत. यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंडळाने प्रवाशांसाठी ऑनलाईन बुकींग व्यवस्थादेखील सुरू केली आहे.

लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांना ही सुविधा सोयीची ठरणार आहे. प्रवासी www.ksrtc.in या वेबसाईटवर तिकीट बुकिंग करून प्रवास करू शकतात. याखेरीज बसस्थानकाच्या ठिकाणीदेखील आगाऊ बुकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.