बेळगाव कॅण्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ के आनंद यांनी शुक्रवारी सुत्रे स्विकारली.
यापूर्वीचे सीईओ बर्चस्वा यांची आसाम (जोहराट) येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी जोहराट येथील सीईओ के आनंद यांची नियुक्ती करण्यात आली.
त्यांचा येथील कँण्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तत्पूर्वी त्यांनी गुरुवारी पुणे येथील सदर्न कमांडमध्ये सुत्रे स्विकारली.
त्यानंतर बेळगावात त्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी, कँण्टोन्मेंटच्या विकासासाठी कार्यरत असणार असल्याचे विचार मांडले. तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यात सहकार्य करावे,असेही आवाहन केले.
यावेळी कार्यालयीन अधिक्षक एम. वाय. ताळूकर, एस. एम. कलाल, प्रियांका पेटकर, अभियंते सतीश मन्नुरकर, बसवराज गुडडगी आदी उपस्थित होते.