बेळगावात गेल्या चार दिवसांपासून जल मंडळाचे कर्मचारी आंदोलन करत होते. आमदार अनिल बेनके यांच्या उपस्थितीत आज जल मंडळ आणि कामगार यांच्यात झालेल्या बैठकीमुळे कामगारांनी आंदोलन मागे घेतले आहे.आमदारांच्या मध्यस्तीमुळे ते आंदोलन मागे पडले आहे.
वॉटर बोर्ड प्लंबर आणि वॉल मॅन संपावर गेले, त्यांनी वेतन टाईम स्केलसह विविध मागण्यांचा विरोध करण्यात आला आहे. परंतु त्यांना सांगण्यात आले की गणपती सण संपल्यानंतर त्यांच्या समस्या सोडवल्या जातील.
त्यांची मागणी पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे असे आमदार बेनके यांनी सांगितल्याने जल मंडळाच्या कामगारांनी आंदोलन मागे घेतले आहे. गणपती उत्सव संपल्यानंतर, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी वॉटर बोर्डचे अधिकारी, कार्पोरेशन अधिकारी आणि एल अँड टी यांच्याशी चर्चा करून समस्या सोडवण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे.
माघार घेतलेल्या आंदोलकांचे आभार व्यक्त करून आमदार बेनके यांनी बेळगावच्या नागरिकांना विनंती केली आहे की, आता पाणीपुरवठा सुरू झाला आहे. दोन दिवसात शहरातील सर्व भागांना पाणीपुरवठा केला जाईल नागरिकांनी सहकार्य करावे.