Thursday, January 2, 2025

/

गरज आत्मचिंतनाची

 belgaum

बेळगाव महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकीत महानगरपालिकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित करून राहिलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीला या निवडणुकीत धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला आहे .गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी म्हणायची वेळ महाराष्ट्र एकीकरण समिती वर आली असून आता तरी समिती नेते कार्यकर्ते आणि समितीनिष्ठ व्यक्तींनी आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीने महानगरपालिकेवरील आपली सत्ता अनेक वर्षे अबाधितपणे राखली होती. या निवडणुकीतही महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता येणार हे स्पष्ट होते. मात्र वॉर्डांची पुनर्रचना ,बदललेले आरक्षण आणि वेगवेगळ्या माध्यमातून वाढलेली अपक्षांची संख्या यामुळे काही प्रमाणात धोका निर्माण झाला. अनेक वार्ड खुले ठेवण्यात आले ,त्या ठिकाणी अधिकृत उमेदवार देण्यात आले नाहीत, त्याचाही फटका या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला बसला आहे.

समितीच्या अधिकृत उमेदवारांच्या वेगवेगळ्या याद्यांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ माजवला असून एका समितीने दिलेल्या अधिकृत उमेदवारांना दुसऱ्या समितीने अनधिकृत ठरवून आपले दुसरे उमेदवार जाहीर करण्या यासारखे प्रकारही या निवडणुकीत धोकादायक ठरले.

राष्ट्रीय पक्षाला अर्थात भाजपला बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुसंडी मारण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती मधील बेकीच कारणीभूत ठरल्याची चर्चा सध्या जोरात ऐकाला मिळत आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीने यापुढे तरी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. बेळगाव शहराच्या विकासासाठी मोठ्या संख्येने निवडून आलेले भाजप काय करते हा प्रश्न महत्त्वाचा असला तरी पराभूत झालेल्या उमेदवारांनी आपल्या पराभवाची पडताळणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.