Thursday, January 2, 2025

/

गांधी जयंतीनिमित्त मेगा रक्तदान शिबिर

 belgaum

रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम -बेळगाव यांच्यातर्फे भारतीय रेड क्रॉस बेळगाव शाखेच्या सहकार्याने गांधी जयंतीनिमित्त येत्या शनिवार दि. 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मेगा अर्थात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

खानापूर रोड, हिंदवाडी येथील महावीर भवन येथे आयोजित केलेले हे शिबिर वेणुग्राम हॉस्पिटलने पुरस्कृत केले आहे. शिबिरासाठीची जागा जैन युवक मंडळ ट्रस्टने उपलब्ध करून दिली आहे.

विशेष म्हणजे सदर शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यांना एक वर्षासाठीचा 1 लाख रुपयांचा अपघात विमा मोफत मिळणार आहे. बेळगावचे न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड विभागीय कार्यालय हे या शिबिराचे पॉलिसी पार्टनर आहेत.

शिबिराला एचडीएफसी बँक टिळकवाडी शाखा, हेबसुर मेडिकल्स टिळकवाडी, इनरव्हील क्लब बेळगाव आणि बेळगाव शहर व तालुका फोटो -व्हिडिओग्राफर संघटना यांचेही सहकार्य लाभणार आहे.

सदर भव्य रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब वेणुग्राम -बेळगावचे अध्यक्ष अरविंद खडबडी, सेक्रेटरी विनयकुमार बाळीकाई, उपक्रम प्रमुख हेमेंद्र पोरवाल, डी. बी. पाटील व त्यांचे सहकारी विशेष परिश्रम घेत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.