बेळगाव महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच बेळगावचा महापौर हा राष्ट्रीय पक्षाचा म्हणजे भारतीय जनता पक्षाचा असणार आहे. याला कारण 58 पैकी 35 जागा जिंकून भारतीय जनता पक्षाने बेळगाव महापालिकेवर मिळवलेले वर्चस्व होय. भाजपने गड जिंकला असताना काँग्रेसला आणि महाराष्ट्र एकीकरण समितीसह अन्य पक्षांना मात्र अनुक्रमे 10 व 13 जागांवर समाधान मानावे लागले आहे.
बेळगाव महानगर पालिका निवडणुकीची मतमोजणी कॅम्प येथील बी. के. मॉडेल हायस्कूल येथे आज कडक पोलीस बंदोबस्तात पार पडली. सदर महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्षाने बाजी मारली असून मतदानामध्ये धक्कादायक निकाल समोर आले आहेत. बेळगाव महानगरपालिकेवर यापूर्वी सातत्याने महाराष्ट्र एकीकरण समितीचे वर्चस्व होते. तथापि यावेळी इतिहास घडवताना निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकता भारतीय जनता पक्षाने बेळगाव महानगर पालिका काबीज केली आहे.
बेळगाव महापालिकेतील वर्चस्वासाठी 33 ही मॅजिक फिगर होती, तथापि भाजपने 58 पैकी 35 जागा जिंकून मॅजिक करताना आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. याउलट काँग्रेसला 10 जागा, अपक्ष उमेदवार 8 जागा, म. ए. समितीला 4 जागा आणि एमआयएमला 1 जागेवर समाधान मानावे लागले आहे.
प्रभागनिहाय निकाल
1 इकरा मुल्ला- अपक्ष
2-मुजमिल डोनी काँग्रेस
3-ज्योती कडोलकर काँग्रेस
4- जयतीर्थ सौदत्ती भाजप
5-हाफीझा मुल्ला काँग्रेस
6-संतोष पेडणेकर भाजप
7-शंकर पाटील अपक्ष
8-महंमद संगोळी- काँग्रेस
9-पूजा पाटील अपक्ष
10- वैशाली भातकांडे समिती
11-समीउल्ला माडीवाले काँग्रेस
12-मोदीनसाब मतवाले अपक्ष
13- रेश्मा भैरकदार काँग्रेस
14- शिवाजी मंडोळकर समिती
15- नेत्रावती भागवत भाजप
16- राजू भातकांडे भाजप
17- सविता कांबळे भाजप
18- शाहीदखन पठाण एम आय एम
19- रियाज किल्लेदार अपक्ष
20 शकीला मुल्ला काँग्रेस
21 प्रीती कामकर भाजप
22 रवी सांबरेकर भाजप
23 जयंत जाधव भाजप
24 गिरीश धोंगडी भाजप
25 जरीना फतेखान अपक्ष
26 रेखा हुगार भाजप
27 रवी साळुंके समिती
28 रवी धोत्रे भाजप
29 नितीन जाधव भाजप
30 ब्रामहानंद मिरजकर भाजप
31- वीणा विजापुरे भाजप
32-संदीप जिरग्याल भाजप
33- रेश्मा पाटील भाजप
34 श्रेयस नाकाडी भाजप
35 लक्ष्मी राठोड भाजप
36 राजशेखर डोनी भाजप
37 शामोबिन पठाण काँग्रेस
38 अजीम पटवेगार अपक्ष
39 उदयकुमार उपरी भाजप
40 रेश्मा कामकर भाजप
41 मंगेश पवार भाजप
42 अभिजित जवळकर भाजप
43 वाणी जोशी भाजप
44 आनंद चव्हाण भाजप
45 रूपा चिक्कलदींनी भाजप
46 हणमंत कोंगाली भाजप
47 अस्मिता पाटील अपक्ष
48 बसवराज मोदगेकर समिती
49 दीपाली टोपगी भाजप
50 सारिका पाटील भाजप
51- श्रीशैल कांबळे भाजप
52 खुर्शीदा मुल्ला काँग्रेस
53 रमेश मैलुगोळ भाजप
54 माधवी राघोचे भाजप
55 सविता पाटील भाजप
56 लक्ष्मी लोकरी काँग्रेस
57 शोभा सोमनाचे भाजप
58 प्रिया सातगौडा भाजप